प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
दौंड शहर व तालुक्यात आमदार राहुल कुल यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज आमदार राहुल कुल यांनी महायुतीमधील सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना साथीला घेत, दौंड रेल्वे स्टेशनवर जाऊन दौंड- पुणे रोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची भेट घेतली. सकाळची 7.05 वा. ची दौंड- पुणे शटल( फुलराणी), हैदराबाद -मुंबई एक्सप्रेस, मुंबई कुर्ला एक्सप्रेस,8.20 वा. ची बारामती- पुणे डेमू या गाडीने रोज प्रवास करणाऱ्या दौंडकर मतदारांशी संवाद साधला,व मतदान करण्याचे आवाहन केले.
दौंडकर प्रवाशांनी सुद्धा आमदार राहुल कुल यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. पुण्याला जाण्यासाठी रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवासी मतदाराची कुल यांनी भेट घेतली. यावेळी युवा मतदारांनी राहुल कुल यांच्याबरोबर सेल्फी काढीत आम्ही तुम्हालाच मतदान करणार असल्याचा शब्द दिला. राहुल यांनी रेल्वे डब्यात जाऊनही दौंडकर मतदारांशी संवाद साधला. राज्यात महायुतीने केलेली विकास कामे तसेच आमदार राहुल कुल यांनी दौंड मतदार संघात आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी व केलेल्या विकास कामांच्या पुस्तिकेचे मतदारांना वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), लहुजी यंग ब्रिगेड, भीम वॉरियर्स संघटना तसेच इतरही मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.