प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या अथर्व पोळ याचा त्याच्या साथीदारांनी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार करुन हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बारामतीमध्ये या हत्या मुळे बारामती हादरले आहे..
अर्थव पोळ (वय १७) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अर्थव पोळ हा बारावीत शिकत होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी सी कॉलेजच्या बाहेर काल सकाळी सर्व विद्यार्थी जमले होते. त्यावेळी अर्थव पोळ व त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या आरोपीमध्ये वाद झाला. भांडण झाल . एक महिन्यांपूर्वी दुचाकीला कट मारण्यावरुन त्यांच्यात कड्याक्याच भांडण झाल होत . अथर्व पोल हा बाहेरगावचा असून साथीदार पळून गेला आहे. अथर्व पोळ हा शिक्षणासाठी बारामतीत आला होता.
एकमेकांना पाहून घेण्याची भाषा झाली. तेव्हा आरोपींनी चाकू काढून अर्थव पोळ याच्यावर ‘सपासप वार केले. अर्थव रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर दोघेही आरोपी पळून गेले. त्यानंतर अर्थव याला सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणण्यात आले. पण डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकाराने बारामती शहरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी ऐका आरोपी ला ताब्यात घेतले असून घटना घडल्यानंतर ५ मिनिटामध्येच पोलीस घटनास्थळी आले होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.