जन सन्मान यात्रा उद्या इंदापुरात …
उपमुख्यमंत्री अजित दादांच्या हस्ते विविध विकास कामांचे होणार भूमिपूजन .
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
I
इंदापूर : उद्या (दि. २३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेले जन सन्मान यात्रा इंदापूर मध्ये दाखल होत आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार असुन जुनी मार्केट कमिटी इंदापूर येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे. प्रमुख उपस्थिती आमदार दत्तात्रय मामा भरणे व प्रदीप दादा गारटकर पुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
विविध विकास कामे
१) शिरसोडी – कुगाव या ऐतिहासिक उजनी बॅकवॉटर वरील पूल
२) वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गडी संवर्धन व ह.चांदशवली बाबा दर्गा सुशोभीकरण
३) इंदापूर शहरातील रस्ते व भूमिगत गटार
कार्यक्रमास तालुक्यातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन आ. दत्तात्रय भरणे यांनी केले आहे