महा आवाज News

घोंगडी बैठकांना सभांचे स्वरूप सर्व सामान्य नागरिकांनी प्रवीण भैय्या माने यांना उचलून धरलं..

प्रतिनिधी:-पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029

इंदापूर तालुक्यात यावेळेस विधानसभेची निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. दोन माजी मंत्री यावेळेस अटीतटीची लढाई लढत असतानाच प्रवीण भैय्या माने या अपक्ष उमेदवाराने दोघांच्या नाकी नऊ आणले आहेत. प्रवीण भैय्या माने सध्या गावोगावी घोंगडी बैठका घेत आहेत. मात्र प्रत्येक गावात या घोंगडी बैठकांना सभांचे स्वरूप प्राप्त होत आहे.


हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना, प्रवीण भैय्या माने यांना गावातील सर्वसामान्य लोक उचलून धरत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात समोर येत आहे.

इंदापूर विधानसभेची यावेळेस ची निवडणूक चांगली चर्चेत आले आहे. इंदापूर तालुक्यात यावेळेस तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट चित्र झाले आहे.

दोन माझी मंत्री आपलं नशीब आजमावत असून त्यांनी एकमेकांशी उणीधुनी काढायला सुरुवात केली आहे. अशातच प्रवीण माने हे तरुण आणि नवीन चेहरा असल्याने लोकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे प्रवीण माने हे दोन्ही विरोधकांवरती टीका करणे टाळत आहे. त्यांच्या या स्वभावामुळे नागरिक त्यांच्यावरती प्रभावित होत आहेत. प्रवीण माने हे आपण विकास कामांवर ती मत मागू असे आवाहन नागरिकांना करत आहेत.

इतरांना शेअर करा