प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा राज्यामध्ये समर्थपणे पुढे चालविणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खा. अमोल कोल्हे यांच्या जंगी प्रचार सभेचे आयोजन निमगाव केतकी येथे शनिवार (दि.16) रोजी सायंकाळी 4 वा. करण्यात आले आहे.
सध्या राज्यभर खा.अमोल कोल्हे यांचा सभांचा धडाका जोरात सुरू आहे. खा. अमोल कोल्हे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग संपूर्ण राज्यामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये आहे. खा.अमोल कोल्हे हे खेड मतदार संघाचे खासदार असलेने पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक, राजकीय क्षेत्रात खा.अमोल कोल्हे यांच्या शब्दाला मोठा मान आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करणे संदर्भात खा.अमोल कोल्हे यांनी विशेष लक्ष दिले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ खा.अमोल कोल्हे यांचे विचार ऐकणे साठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केले आहे.