महा आवाज News

खानवटे येथील गटर चारीमध्ये,चोर चोर मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ उप अभियंता आणि शाखा अभियंता यांनी केली कामाची पाहणी !

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

•चौकट….
योगेश दिवेकर ग्रामिण पा.पु.विभाग प.स.दौंड यांना संपर्क साधला असता ते म्हणाले आमच्या विभागाचे कर्मचारी शिंदे यांनी मला चुकीची माहिती दिली.त्यांना संबधित कामावर पाहणीसाठी पाठवले होते त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे.आणि कामात हयगय झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे.

खानवटे ता.दौंड येथील भूमिगत गट योजनेचे काम हे १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून तिन ठिकाणी करण्यात आले आहे.हे काम अतिक्रमण मध्ये शासकीय गायरान गट नंबर २८८ मध्ये झालेले आहे.या कामाची कसलीही परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतलेली नसून सदरचे क्षेत्र हे जिल्हाधिकारी पुणे यांच्या मालकीचे असून विनापरवाना खोदाई करून गटर योजनेचे काम शासकीय जागेत करण्यात आले आहे.तसेच झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असून,शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती दौंड आणि उपअभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती दौंड यांनी कामाची पाहणी न करता,काम इस्टिमेट नुसार न करता,गटरचारीचे खोदाईचे काम इस्टिमेट प्रमाणे न करता,चेंबरची संख्या कमी करून गटरचे पाईप फक्त दिड फुट गाढलेले आहेत. चेंबर लांब अंतरावर टाकलेले आहेत.

त्यामुळे गटरपाईप लाईन ही जमिनीच्या वरच असून ती फुटण्याची दाट शक्यता आहे.तसेच चेंबर जास्त अंतरावर असल्याने गटचारी जाम (ब्लॉक) होऊन लिकेज होऊन दुर्गंधी पसरण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.म्हणून संबंधित कामाविषयी माजी सरपंच बबनराव धायतोंडे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे,जिल्हा अधिकारी पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित दौंड पंचायत समिती चे पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता योगेश दिवेकर आणि उपाभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.त्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांनी कार्यकारी अभियंता पा.पु.विभाग जि.प.पुणे यांना आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी असे दि.०७/१०/२०२४ रोजी लेखी कळविले आहे.

त्यामुळे आता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती येथील शाखा अभियंता योगेश दिवेकर व उपअभियंता ढाके आणि ठेकेदार हे चोर चोर मावसभाऊ आणि दोघे मिळून वाटून खाऊ, अशी चर्चा खानवटे गावात जोरात चालू आहे.
यांच्यावरती काय कारवाई होणार याकडे सर्व खानवटे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

इतरांना शेअर करा