प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) कि. मी. ४३ (लोणीकाळभोर, ता. हवेली) ते कि. मी. १०९ (भागवतवस्ती पाटस, ता. दौंड) एकूण ६७ कि. मी. लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन आज वरवंड, ता. दौंड येथे आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते पार पडले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कुल यांच्या मागणीनुसार खडकवासला जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) कि. मी. ४३ (कुंजीरवाडी – लोणीकाळभोर, ता. हवेली) ते कि. मी. १०९ (भागवतवस्ती पाटस, ता. दौंड) एकूण ६७ कि. मी. लांबीच्या अस्तरीकरण व मजबूतीकरण या कामासाठी सुमारे १७९.८८ कोटी रुपयांच्या निधीस विशेष दुरुस्ती विस्तार व सुधारणा अंतर्गत मंजुरी दिली आहे. या कॅनॉलचे अस्तरीकरण व मजबूतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढणार असून शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच वरवंड गावठाण हद्दीतील जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) बंदिस्त करण्याच्या सुमारे २ कोटी ६५ लक्ष खर्चाच्या कामाचे देखील यावेळी भूमिपूजन करण्यात आले.
स्व. आमदार सुभाष आण्णा कुल हे त्यांच्या राजकीय सामाजिक जीवनात काम करीत असताना नेहमीच पाण्यासाठी आग्रही असत, तोच वसा आणि वारसा जपत आमदार राहुल कुल यांनी तालुक्यातील नागरिकांना शेतीसाठी व पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावे, यासाठी मी देखील नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे.
विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात तालुक्यातील पाणी प्रश्नावर आवाज उठवला, २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालीन जलसंपदा गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतरे यांचेकडे बैठका घेण्यात आल्या विधिमंडळात विनंती अर्ज समितीकडे देखील अर्ज सादर केला होता.
त्यामाध्यमातून देखील बैठका घेण्यात आल्या. विधिमंडळात मिळालेल्या आश्वासनाबाबत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष यांचेकडे देखील बैठक घेण्यात आली.
२०१९ ते २०२४ या कालावधीत सध्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे अनेक बैठका घेतल्यानंतर या सर्व पाठपुराव्याला यश आले आहे.
सुरुवातीला किमी ९२ ते किमी १०९ (केडगाव ते पाटस) या परिसरातील कामाला सुरुवात होणार आहे. व नंतर दुसऱ्या टप्प्यात किमी ७६ ते किमी ९२ (यवत ते केडगाव) या भागातील काम होणार आहे.
यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल, खडकवासला पाटबंधारे विभागच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, उपअभियांता यवत उपविभाग सचिन पवार, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव नाना बारवकर, तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, संजय दिवेकर, तानाजी दिवेकर, एम. डी. आण्णा फरगडे, गोरख आण्णा दिवेकर, अशोक फरगडे, संतोष आखाडे, जयश्रीताई दिवेकर, डॉ. मधुकर आव्हाड, राजेंद्र मोटे, दशरथ पाटील गरदरे, सचिन सातपुते यांच्यासह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.