प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास कांदलगाव व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली.
सोनाई परिवाराचे संचालक श्री अतुल माने यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन पार पडले. कांदलगाव येथील श्री दत्त मंदिर येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत ६५३ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ४०२ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १० नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
कांदलगाव येथे पार पडलेल्या या शिबिराचे
साधू सरडे, नरेश कुंभार, सुरज काशीद, राजू जाधव, निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर, डॉ. शरद शिर्के, डॉ. तमन्ना शेख, डॉ. संतोष रणवरे, डॉ शेख यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व व्यवस्थापन पाहिले.
या शिबिराच्या निमित्ताने गणेशजी मोहिते, सनी बंडगर, पांडुरंग राखुंडे, साधू ननवरे, आप्पासो राखुंडे, समाधान राखुंडे, बाळासाहेब हजारे, नवनाथ सरडे, वैभव गिरी, नवनाथ काशीद, साधू सरडे, राजू जाधव, बालाजी काशीद, नरेश कुंभार, विलास मोरे, अतुल जगताप, तुकाराम सुतार, समाधान मदने, निलेश राखुंडे, नामदेव राखुंडे, पप्पू ननवरे, प्रदीप सरडे, सिद्धू कोळी, निलेश रंधवे, महावीर सातव हे मान्यवर उपस्थित होते.