प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
सध्या इंदापूर विधानसभेचे निवडणुकीचे वारं चांगलंच तापलं आहे. हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारात पुढाकार घेतला आहे. मात्र दुसरीकडे प्रवीण माने यांच्यासाठी गावा गावातले तरुण-तरुणी देखील भाषण करून मैदान गाजवत आहेत. काल डाळज येते प्रवीण माने यांच्या घोंगडी बैठकीत आलेल्या एका तरुणीने प्रवीण माने यांच्यासाठी केलेले भाषण इंदापूर तालुक्यात चांगले चर्चेत आहे. या तरुणीने आपण पहिल्यांदाच मतदान करत असून ते युथ आयकॉन असलेल्या प्रवीण भैय्यां साठी मतदान होत असल्याचा आपल्याला अभिमान असल्यास भाषणात सांगितले. याशिवाय तिने मांडलेले वेगवेगळे मुद्दे चांगलेच चर्चेत आले. तिचे हे भाषण इंदापूर तालुक्यात चांगलेच वायरल झाल आहे.
काल डाळच येते अपक्ष उमेदवार प्रवीण भैय्या माने यांनी घोंगडी बैठक घेतली. विशेष म्हणजे या घोंगडी बैठकीला महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. याचवेळी एका राष्ट्रीय खेळाडू असलेल्या तरुणीने गावातील गावातील प्रश्न मांडले. याचवेळी तिने आपण पहिल्यांदाच मतदान करत असून हे मतदान एका युथ आयकॉनला होत असल्याचा आपल्याला आनंद आहे.
याशिवाय प्रवीण भैय्या माने हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून एक उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. आता त्यांनी आमच्यासारख्या तरुणांसाठी इंदापूर मध्ये एका मोठ्या अकॅडमीची निर्मिती करावी अशी मागणी ही तिच्या भाषणात केली.
आता आम्ही एवढ्या सगळ्या महिला तुमच्या मागे असल्यावर तुम्हाला कोणतही टेन्शन घ्यायची गरज नाही असे म्हणून तिने उपस्थित यांची मन जिंकली. तिच्या याच वाक्यानं काल इंदापूर मध्ये धुमाकूळ उडवला.