महा आवाज News

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे घेतले दर्शन…

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळात असणारे गणराज लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन निवासस्थानी असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा केलेली पाहायला मिळाली.

माजगावच्या अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ही भेट दिली आहे. तसेच सिद्धिविनायक मंदिरात पूजाही केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणपतीचे दर्शन घेतले.


मी राज्य आणि देशाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. अशी प्रार्थना देखील त्यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या प्रसंगी केलेली असे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितले.

इतरांना शेअर करा