महा आवाज News

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बारामती मध्ये जनसन्मान यात्रेची जोरात तयारी…

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची बारामती मध्ये जनसन्मान रॅली दि. 2 सप्टेंबर या रोजी होणार आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या सभेची बारामती मध्ये जोरात तयारी चालली आहे.

उद्या सकाळी 10:00 वाजता उपमुख्यमंत्री पवार यांचे विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर विमानतळ येथून गाडीने अजितदादा पवार मार्गस्थ होणार आहे. यावेळी पवार यांच्या गाडी पुढे 2000 चाकी स्वार पुढे सहभागी होणार आहेत. त्यानंतर भिगवण रोड मार्गे न्याय मंदिर चौकातून डाव्या हाताने हॉटेल सुदीप, माळावरची देवी, रिंग रोड ते इंदापूर रोड, मोतीबाग येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पवार यांचे आगमन होणार आहे.

10:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून इंदापूर बारामती रस्ता, एसटी बस स्टँड चौक, रिंग रोड ,धवल सर्कल, कारभारी सर्कल मार्गे अजितदादा पवार कसबा येथे शिवाजी उद्यानात पोहोचणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अजित दादा पवार यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

सकाळी 11 वाजता रोड शो होणार असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल ,खासदार सुनील तटकरे पुढे राहणार आहे. यावेळी प्रमुख नेते वाहनाने सभेच्या ठिकाणी पोचणार असून कसबा हॉटेल चैत्राली, चांद सावली दर्गा ट्रस्ट गुणवडी चौक , राजस्थान कापड दुकान ,गांधी चौक, मारुती मंदिर, भिगवन चौक, नटराज कलादान येथे रोड शो समाप्त झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार तेथून वसंत नगर मार्गे टीसी कॉलेज बाजूने हॉस्टेल पासून सभास्थानापर्यंत दाखल होणार आहेत. जनसन्मान यात्रा कार्यक्रम 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत मिशन हायस्कूल मैदान येथे होणार आहे..

इतरांना शेअर करा