महा आवाज News

उजनी धरणामध्ये चार कोटी रुपयांचे मत्स्यबीज सोडण्यात यावे अशी मागणी – हर्षवर्धन पाटील …

प्रतिनिधी: पल्लवी चांदगुडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029

उजनी धरणामध्ये चार कोटी रुपयांचे मत्स्यबीज सोडण्यात यावे अशी मागणी – हर्षवर्धन पाटील …

उजनी धरणांमध्ये पुणे व सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचे मत्स्य बीज सोडण्यात यावे अशी मागणी मा. सहकार व संसदीय कार्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन भाऊ पाटील यांनी केली आहे.

याबाबत माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री यांचेकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. याबाबत पाठविलेल्या पत्रानुसार उजनी धरण हे महाराष्ट्रातील गोडया पाण्यातील मासेमारीचे एक महत्वाचे केंद्र आहे.

पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्हयातील हजारो कुटुंब ही उजनी धरणातील मासेवारीवरती अवलंबुन आहे. सध्या अनुकूल पर्जन्यमाना मुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.

काही दिवसांत धरणातील नदी पात्रांमध्ये सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येईल. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचे तर सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची मत्स्य बीज उजनी धरणांमध्ये सोडण्यात यावीत.

दोन्ही जिल्हा परिषदांच्या नियोजन समितीच्या माध्यमातून उजनी धरणांमध्ये मत्स्यबीज सोडल्यास उजनी धरण परिसरातील मच्छीमारांना मोठा फायदा होईल.

याबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, उजनी धरण हे गोडया पाण्यातील मासेमारीच्या दृष्टीने एक महत्वाचे धरण आहे.
धरणा मध्ये योग्य वेळी मत्स्यबीज सोडल्यास पुणे सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील मच्छीमारांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो ही बाब विचारात घेऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून दोन्ही जिल्ह्याच्या माध्यमातून धरणांमध्ये चार कोटी रुपयांचे मत्स्यबीज सोडावे अशी मागणी केली आहे. याबाबत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी ही चर्चा झाली आहे. याबाबत निश्चित सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करु.

इतरांना शेअर करा