प्रतिनिधी : पल्लवी चांदगुडे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क; 9373004029
ईद-ए-मिलाद निमित्ताने मा.मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा…
इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील दर्गा मस्जिद या ठिकाणी जाऊन दर्ग्यावर चादर चढवली व उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना ईद च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगासाठी शांततेचा संदेश दिला त्यांच्या जयंती निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो.’
यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला.