महा आवाज News

इंदापूर महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा.. – २३० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते . माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष , संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या परीक्षेत महाविद्यालयातील २३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


या कार्यक्रमाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ २६ सप्टेंबर २०२४ रोजी शाहीर अमरशेख सभागृहात पार पडला. या प्रसंगी बँक ऑफ बडोदा, पुणे जिल्हा क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ प्रबंधक व राजभाषा विभाग प्रमुख मालविका, पुणे क्षेत्रीय कार्यालय अधिकारी जेन रेबेलो, आणि इंदापूर शाखा प्रबंधक सचिन नाईकवाडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे त्यांनी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.


या समारंभात महाविद्यालयाचे विद्यार्थी मंगेश सुरवसे, गायत्री शिंदे आणि रितिका सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख उपस्थित व्यक्तींनी आपापल्या भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या शेवटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रोहन व्यवहारे यांनी केले.
सुत्रसंचलन प्रा. शाम सातार्ले यांनी केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. बापू घोगरे यांनी मानले.

या कार्यक्रमास प्रा. डॉ.तानाजी कसबे , प्रा. राजीव शिरसट, प्रा. दीपक वडापुरे, प्रा. नामदेव पवार , प्रा. फिरोज शेख यांचे सहकार्य लाभले.

इतरांना शेअर करा