खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाकरिता सहकार्य करू – राजवर्धन पाटील
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात विभागीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन युवा नेते व संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण 13 क्रीडा प्रकारांचा समावेश होता. गोळा फेक, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी,उंच उडी, तिहेरी उडी, हॉलीबॉल, बास्केटबॉल,कबड्डी, खो-खो, धावणे, रिले, चेस इत्यादी तसेच प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र व केंद्रीय क्रीडा महोत्सवाची निवड पत्र लगेच देण्यात आली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 85 विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला.
राजवर्धन पाटील आनंद व्यक्त करीत म्हणाले की,’ महाविद्यालयातील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम आमच्याकडुन केले जाईल तसेच अशा प्रकारच्या क्रिडा स्पर्धेचे जास्तीत जास्त प्रमाणात आयोजन होणे गरजेचे आहे.”
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय समन्वयक संतोष वामन म्हणाले की, ” आपल्या सर्व अभ्यास केंद्रात क्रिडा स्पर्धा आणि अभ्यास यांचा समन्वय साधला जातो.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे,नाशिक येथुन उपस्थित राहीलेले रसायनशास्त्र अधिष्ठाता प्रा .भारत मोरे साहेब .पुणे विभागीय कार्यालयाचे कार्यालयाचे क्रीडा समन्वयक , संतोष कडबाने, तानाजी लंगोटे, व डॉ.शिवाजी वीर, डॉ.भिमाजी भोर, डॉ.सदाशिव उंबरदंड, डॉ. राजेंद्र भोसले यावेळी उपस्थित होते.
इंदापूर अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. युवराज फाळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या क्रीडा स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा गाडेकर यांनी काम पाहिले .
या क्रीडा स्पर्धासाठी पंच म्हणून सुनील जाधव, बागल एच.डी, गलांडे.टी.पी, नरुटे टी.बी., घोगरे.बी.बी, घाडगे.एस.टी , अण्णासाहेब खटके सर, रामदास देवकर, डी.एस.वाबळे, ए.आर.बनकर यांनी कार्य केले.
क्रीडाशिक्षक बापू घोगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.राजेंद्र भोसले यांनी मानले.
प्रा.निशांत पवार, प्रा.दर्शन दळवी,प्रा. राजीव शिरसट, डॉ.रामचंद्र शेलार, प्रा.कल्याणी देवकर तसेच दादा कांबळे, सुरेश शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.