प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशान्वये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त आज बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यालय अधीक्षक अश्विनी अडसूळ, ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अब्राहाम आढाव, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. आढाव यांनी माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत असलेल्या विविध तरतुदी, त्याचा वापर आदी बाबाबत माहिती दिली. यावेळी माहितीचा अधिकार अर्ज करताना येणाऱ्या अडचणी, अर्जांना द्यावयाची उत्तरे याबाबत शंकाचे निरसन करण्यात आले.
नगर परिषदेच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडाअंतर्गत यावर्षी ‘स्वभाव स्वच्छता –संस्कार स्वच्छता’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सामुहिक स्वच्छता शपथही यावेळी देण्यात आली.