प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर विधानसभेचीं यंदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार हे सांगण्यासाठी आता कोणत्याही ज्योतिषाची गरज उरली नाही, एकीकडे हर्षवर्धन पाटील दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांना सध्या आपापले मतदार सांभाळून ठेवण्यातच मोठ आव्हान उभे राहिलं असतानाच अपक्ष उमेदवार प्रवीण भैया माने यांनी इंदापूर तालुक्यात सर्वात मोठा कळीचा मुद्दा असलेला उसाचा प्रश्न नवा कारखाना काढून मार्गी लावण्याचा शब्द प्रत्येक सभेत देत आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये आणखी एक कारखाना उभा राहून शेतकऱ्यांचे अर्थकारण असलेल्या उसाचा प्रश्न निकाले निघणार यावर आता गाव खेड्यांमध्ये गप्पा रंगू लागले आहेत.
दोन्ही माजी मंत्री एकमेकांचा भ्रष्टाचार काढत असताना प्रवीण माने यांनी मात्र उसाचा दर तरुणांची नोकरी या विषयावरती भर देऊन प्रचारात लोकांची मन जिंकायला सुरुवात केली आहे. प्रवीण माने यांच्या गाव खेड्यातील सभेला गावातली लोक उस्फूर्तपणे प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यात होत असलेल्या तिरंगी लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. हर्षवर्धन पाटील, त्यांची कन्या अंकिता ठाकरे पाटील दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांचं कुटुंब प्रचारात उतरलं आहे.
तर अपक्ष उमेदवार प्रवीण भैय्या माने, दशरथ दादा माने, कुमार शेठ माने, अतुल माने, मयुरी माने हे सर्वजण आपापल्या पद्धतीने गाव भेटी घेऊन तालुका पिंजून काढत आहेत.
प्रवीण माने यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातील अस्मितेचा विषय असलेल्या ऊस दर, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न, आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाला हात घातला आहे.
त्यामुळे प्रवीण माने यांच्या सभांना तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न मार्गी लागणार याबाबत अशा पल्लवी झाले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने का होईना इंदापूर तालुक्यात अजून एक कारखाना झाला तर प्रपंचाला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही अशीच चर्चा आता इंदापूर तालुक्यात रंगू लागले आहे.