महिलांची उपस्थिती लक्षणीय!
-मंगळवार जनसंवाद यात्रेचा 3 रा दिवस
प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे ..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाच्या युवा नेत्या व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या रविवार पासून इंदापूर तालुक्यामध्ये चालू असलेल्या जनसंवाद यात्रेस जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अंकिता पाटील ठाकरे ह्या इंदापूर तालुक्याचा गेल्या 10 वर्षात झालेल्या नियोजन शून्य विकासाचा व मलिदा गँगच्या भ्रष्टाचाराचे वास्तव चित्र जनते समोर मांडत आहेत. या जनसंवाद यात्रेचा मंगळवार (दि.15) हा 3 रा दिवस होता.
व्याहळी येथील भैरवनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून अंकिता पाटील ठाकरे यांनी या जनसंवाद यात्रेचा रविवारी (दि.13) सकाळी शुभारंभ केला.
इंदापूर तालुक्यात गेल्या 10 वर्षांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधिकडून शिक्षण क्षेत्रात, रोजगार उपलब्ध करुन देणे आदी अनेक क्षेत्रामध्ये विकासाचे कोणतेही काम झालेले नाही. तालुक्यात फक्त मलिदा गँगच्या ठराविक लोकांचाच विकास झाला आहे.
त्यामुळे विकासाची निकृष्ट कामे करणारी मलिदा गॅंग हटाव तालुका बचावचे आवाहन अंकिता पाटील ठाकरे या जनसंवाद दौऱ्यात करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधिमंडळात पाठविण्याचे आवाहन केले आहे, त्यास जनतेने साथ द्यावी व इंदापूर तालुक्याच्या विकासाची जबाबदारी सोपवावी, असे आवाहनही अंकिता पाटील ठाकरे करीत आहेत.
या जनसंवाद यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ, इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर आदिसह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.