प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी (भाग्यश्री बंगलो) येथे शारदीय नवराञोत्सवानिमित्त महिलांचे सप्तशती पाठ वाचन मंगळवारी (दि.8) उत्साही वातावरणात संपन्न झाले. या सप्तशती पाठ वाचनामध्ये उपस्थित महिलांची संख्या लक्षणीय होती.
नवरात्रोत्सवाच्या शुभ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण अत्यंत फलदायी, हितकारक आणि शुभ असते. दुर्गा देवी आराध्य दैवत मानली जाते. दुर्गा सप्तशती पाठ वाचनामुळे सर्वत्र सुख समाधान, शांती निर्माण व्हावी, चांगले पर्जन्यमान व्हावे, जनता आनंदी राहावी, अशी मनोकामना व्यक्त केल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.
दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. त्यात एकूण 700 श्लोक असून, ते 3 भागात विभागलेले आहेत. दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये दुर्गा देवीच्या विजयाचे वर्णन केले आहे. दरम्यान यावेळी जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व अंकिता पाटील ठाकरे यांनी महिलांना नवराञोत्सवानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.