प्रतिनिधी :- संजय शिंदे
एक फेब्रुवारी या दिवशी राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस असतो. या दिनाचे औचित्य साधून बुद्धवाशी दामोदर रामचंद्र लोंढे गुरुजी सार्वजनिक वाचनालय कुंभारगाव यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
मौजे कुंभारगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे शैक्षणिक साहित्य, पेन, शिशी पेन्सिल, खोडरबर, शॉपनर व वह्यांचे वाटप करण्यात आले . इंदापूर तालुक्याचे लाडके नेते राजवर्धन दादा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व शिक्षक, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या दादांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक ताराचंद ढोले सर ,खोमणे सर, चौधरी सर ,वनवे सर, गावडे सर, इंगुळकर सर, साबळे मॅडम ,मेत्रे सर ,उपस्थित होते.