अनेक गावातून विविध कार्यक्रमांचे आयोजन
बारामतीच्या अनेक गावात आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पाहायला मिळाले. या सर्व ठिकाणी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती दिसत होती.
आज सकाळी ‘सर्वप्रथम’ पोलीस मदत केंद्रात ध्वजारोहण पोलीस उपनिरीक्षक जिग्नेश कोळी यांचे हस्ते पार पडले. यावेळी ग्रामस्थ व सर्व स्थानिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यानंतर मोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ अलकामाई तावरे यांच्या हस्ते तसेच श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य खराटे सर यांनी हे ध्वजारोहण केले.
मोरगाव येथे विविध संस्था व तरुण मंडळांच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयात विविध विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शाळेतील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.