प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
भिगवण येथील महिला वर्गासाठी प्रविणभैय्या माने मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला. भिगवण येथील व्यंकटेश लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भिगवण व परिसरातील महिला वर्गाने आवर्जून उपस्थिती लावली.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस मानाची पैठणी साडी भेट देण्यात आली होती, तर प्रमुख बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांकाच्या पारितोषिक साठी एल इ डी टीव्ही, द्वितीय पारितोषिक फ्रीज, तिसऱ्या क्रमांकासाठी कुलर, तर चौथ्या क्रमांकाला पिठाची चक्की आणि पाचवे पारितोषिक मिक्सर देण्यात आला.
काळेवाडी नं. २ च्या शिवानी सौरभ काळे यांना प्रथम क्रमांक, तक्रारवाडीच्या सोनाली सागर बनसोडे यांना दुसरा क्रमांक, कुंभारगावच्या अश्विनी महेश काशीद यांना तिसरा क्रमांक, शेटफळगडे च्या नीता ज्ञानदेव करे यांना चौथा क्रमांक, तर डाळज नं ३ च्या तारामती संभाजी जगताप यांना पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
अनिकेत निंबाळकर, किरण लावंड, मनोहर बापू हगारे, आप्पासो गायकवाड, दादासाहेब थोरात, विजयाताई कोकाटे, जयश्रीताई धुमाळ, आम्रपाली बंडगर, आकाश बंडगर, कुंडलिक धुमाळ, दादासाहेब मारकड, विजयकुमार गायकवाड, प्रदीप गायकवाड, पंकज काशीद, नानासाहेब धापटे, मकरंद जगताप, संजय मोरे, श्रीकांत काशीद,लालासो बंडगर, दादा जाधव, धनाजी थोरात, रूपाली रणदिवे, हेमाताई माडगे, मंजिरीताई लावंड, वंदनाताई शेलार, तृप्ती देशमुख, सुजाताताई सोनवणे, गीता दराडे, तरन्नुम शेख, सुजाता राक्षे, शिवाजी जगताप, मनीषा ढोले, रेखाताई पाचंगणे, जयश्रीताई गायकवाड व समस्त माने कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.