प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
दौंड तालुक्यातील खडी क्रेशर मालकांचे व पुणे जिल्ह्यातील शासकीय महसूल अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याची चर्चा दौंड तालुक्यात चालू आहे.
दौंड तालुक्यातील वासुंदे, जळगाव, पांढरवाडी येथे खडी क्रेशर मालकांचा मुरूम उत्खन्याचा रात्रंदिवस कार्यक्रम चालू आहे. प्रिंट मीडिया ,सोशल मीडिया यांनी वारंवार खडी क्रेशर यांच्या विरोधात आवाज उठवून देखील संबंधित प्रशासकीय अधिकारी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करत नाहीत. त्यामुळे खडी क्रेशर मालक आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची एकमेकांना काही भागीदारी असल्याची चर्चा दौंड तालुक्यातच नाही तर इतरही तालुक्यात रंगलेले पाहायला मिळत आहे.
खडी क्रेशर संबंधित अधिकाऱ्यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी लावण्यात यावे अशी मागणी खडी क्रेशर त्रासाला कंटाळून सर्वसामान्य नागरिक करत आहेत. या बड्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काळा कारभार उजेडात येईल असे वक्तव्य हनुमंत जामले यांनी केले आहे.
पालखी महामार्गाला चिकटूनच खडी क्रेशर मालकांना संबंधित प्रशासकीय अधिकारी खडी क्रेशर चालवण्यासाठी परवानगी कशी देतात. वन विभागाच्या जवळ खडी क्रेशर चालवण्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी परवानगी कशी देतात. एकाच गावामध्ये 18 खडी क्रेशर चालवण्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी परवानगी कसे देतात. मग त्यांनी संबंधित अधिकारी आणि खडी क्रेशर यांच्यात आपापसात भागीदारी झाली आहे का? अशी चर्चा सर्वत्र चालू आहे.
संबंधित ग्रामस्थांनी या खडी क्रेशर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना चौकशी केली असता आम्ही नोटीस काढलेले आहेत. असे उत्तरे ऐकायला मिळतात. पण ठोकपणे आम्ही कारवाई केले आहे . संबंधित ठेकेदार यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे असं ठाम उत्तर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दिले जात नाही. उलट एका प्रशासकीय विभागाकडून दुसऱ्या प्रशासकीय विभागाकडे उडवा उडवी ची आणि टोलवा टोलवीची उत्तरे दिली जातात.
संबंधित प्रशासकीय विभाग आम्ही प्रशासंबंधी प्रशासकीय विभागांना अर्ज दिलेला आहे असे उत्तरे देऊन मोकळे होतात. मात्र या खडी क्रेशर मालकाने संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या मध्ये भरडला जात आहे तो सर्वसामान्य ग्रामस्थ. सर्वसामान्य ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. अनेक आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. मात्र संबंधित प्रशासकीय बांधकरी जसा शेजारच्या वर आलेल्या संकटाची मज्जा पाहतो तसं संबंधित प्रशासकीय अधिकारी ह्या ग्रामस्थांची मज्जा पाहत असलेले चित्र पाहायला मिळत आहे.
खडी क्रेशर मालक यांना मदत करणाऱ्या चाणक्य मेंदू असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना काळया यादीत टाकावे. अशी मागणी वासुंदे गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.