प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
लुमेवाडी येथील प्रसिद्ध दर्गा हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांच्या दर्ग्याचा उरूस समस्त लुमेवाडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे प्रविण माने यांनी गाजी – ए – मिल्लत सुफी संत हाजी हाफिज फतेह मोहम्मद जोधपूरी बाबांच्या मजारवर चादर चढवून दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व उत्सव कमिटी सदस्यांशी माने यांनी संवाद साधला तसेच उत्सव कमिटीच्या वतीने प्रविण माने यांचा सत्कार ही करण्यात आला. इंदापूर तालुक्यासह संपूर्ण राज्यभर या दर्ग्यासाठी लुमेवाडी प्रसिद्ध असून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या जोधपुरी बाबांच्या दर्ग्यावर हिंदू – मुस्लिम भाविक मोठ्या भक्तीभावाने दरवर्षी येत असतात.
प्रविण माने यांनी लुमेवाडी येथे दिलेल्या भेटीच्या वेळी बाळासाहेब कोकाटे, राजूभैय्या शेख, मोहन काटे, सुरेश कोकाटे, नागेश गायकवाड, नवनाथ कोकाटे, सनी बंडगर, गणेश मोहिते, शाहेजमान शेख, नियाज़ शेख, वाहिद सय्यद, शरीफ शेख, जाकिर पठान, मुजावर आदम, अहमद शेख, यासीन काजी, जाबिर पठान, सद्दाम काझी, रिजवान मुलानी, रीयाज सय्यद, उस्मान गनी शेख, मुस्तकिन शेख, रियासत पठान, आसिफ शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.