प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
_अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर केला असून, ‘मी आणि माझ्या आईच्या वतीने महाराष्ट्रातील नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’ अशी पोस्ट केली आहे._
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत अजित पवार यांनी लिहिले की, “माझ्या आणि माझ्या आईच्या वतीने मी महाराष्ट्रातील माता, शेतकरी, मजूर, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही दिवाळी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.”